पब्लिक सेटिंगवर व्हिडिओ पोस्ट झाल्यावर 80,000 दा शेअर केला गेला आणि व्हायरल झाला. एवढंच नव्हे तर अनेकदा या व्हिडिओची नक्कल करण्यात आली मीम बनवली गेली. रूबी इबारा ग्रेसियाचे वडील क्रेसेन्सियो यांनी सर्वांना वाढदिवसाला निमंत्रण देत व्हिडिओमध्ये म्हटले, हॅलो, आपण सर्व कसे आहात? आम्ही 26 डिसेंबरला आमची मुलगी रूबी हिचा 15 वा वाढदिवस साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना येयचे आहे. आपल्या स्वागत आहे.
यावर तयार करण्यात आलेल्या मिमीजमध्ये एकात डोनाल्ड ट्रंप आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष दोघेही एक करार करत आहे. यात मेक्सिकोमध्ये रूबीच्या पार्टीत सामील होण्यासाठी मेक्सिको स्थलांतरित लोकांना परत पाठवण्याची परवानगी देण्याची गोष्ट आहे. तर एका मिमीत मेक्सिकोचे अभिनेता गेएल बर्नल एका कॉमेडी शोमध्ये मिस्टर इबाराची नक्कल करत आहे.