एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी लोक मेहनत करत आहेत, तर दुसरीकडे नोकरदार लोकही आपले काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण कल्पना करा की एखाद्या व्यक्तीच्या खात्यात एका महिन्याच्या कामाच्या बदल्यात 286 महिन्यांचा पगार येतो, तर ते खूप धक्कादायक असेल. असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे अचानक एका व्यक्तीच्या खात्यात इतके पैसे आले की विश्वास बसत नाही. मग असं काही घडलं ज्याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल.