भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरला, किमान 20 लोकांच्या मृत्यू,रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रता

गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (08:51 IST)
आज पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तान हादरला. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हरनाई भागात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यात किमान 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप पाकिस्तानात हरनाईला झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
एका वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे दक्षिण पाकिस्तानला आलेल्या भूकंपामध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. बलुचिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखाने  सांगितले की आतापर्यंत 15 ते 20 लोकांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो.
 
भूकंप झाल्यास काय करावे?
*  आपण भूकंप आल्यावर घरी असाल तर जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करा. 
* किंवा आपल्या  घरात टेबल किंवा फर्निचर असेल तर त्याखाली बसा आणि डोकं हाताने झाका.
* भूकंपाच्या वेळी घरामध्ये रहा आणि हादरे थांबल्यानंतरच बाहेर जा.
* भूकंपाच्या वेळी घरातील सर्व पॉवर स्विच बंद करा.
 
भूकंप आल्यावर काय करू नये?
* आपण भूकंपाच्या वेळी घराबाहेर असाल तर उंच इमारती आणि विद्युत खांबांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 
* भूकंपाच्या वेळी आपण  घरी असाल तर बाहेर जाऊ नका. आपण जिथे आहात तिथे स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. 
*  भूकंपाच्या वेळी घरी असाल तर दरवाजे, खिडक्या आणि भिंतींपासून दूर रहा.
* भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर अजिबात करू  नका.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती