अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:28 IST)
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात सोमवारी झालेल्या भूकंपात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंप इतका जोरदार होता की अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांत असलेल्या बादघिसमधील कादीस जिल्ह्यातही घरे कोसळू लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक लोकांचा मृत्यू त्यांच्या घरात दबल्यामुळे झाला आहे.
 
एएनआयने वृत्तसंस्था एएफपीच्या हवाल्याने म्हटले आहे की, भूकंपात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी होती. यापूर्वी शुक्रवारीही अफगाणिस्तानातील फैजाबादजवळ भूकंपाचे धक्के जाणवले होते.
 
अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या उत्तर भागात शुक्रवारी रात्री 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. पाकिस्तानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या क्षणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. पेशावर, मानशेरा, बालाकोट आणि चारसादासह खैबर-पख्तुनख्वामधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाच्या उत्तरेलाही भूकंपाचे धक्के जाणवले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती