अमेरिकेतील ज्यू धर्मस्थळावर दहशतवादी हल्ला

रविवार, 16 जानेवारी 2022 (16:23 IST)
अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी एका दहशतवाद्याने ज्यूंच्या मंदिरावर (सिनेगॉग) हल्ला करून 4 जणांना बंदी ठेवले. बंदी केल्यानं पैकी  एकाची सुटका करण्यात आली. टेक्सास तुरुंगात बंद असलेल्या पाकिस्तानी न्यूरोसायंटिस्ट आफिया सिद्दिकीची सुटका करण्याची मागणी या दहशतवाद्याने केली आहे. अल कायदाशी संबंध असल्याच्या कारणावरून अफियाला अमेरिकेत तुरुंगात शिक्षा झाली होती
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी (अमेरिकेची वेळ) डॅलस भागातील एका सिनेगॉगमध्ये लोकांना बंधक ठेवण्यात आले होते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्याने 4 जणांना बंदी ठेवले आहे. टेक्सास पोलीस, SWAT पथक आणि FBI टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे.
कोण आहे आफिया सिद्दीकी?
डॉ.आफिया सिद्दीकी या पाकिस्तानच्या नागरिकावर अल कायदाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या  तिने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केली आहे. 2003 मध्ये जेव्हा दहशतवादी खालिद शेख मोहम्मद याने एफबीआयला सिद्दीकीचे नाव प्रसिद्ध केले होते. या माहितीच्या आधारे अफियाला अफगाणिस्तानातून अटक करण्यात आली. तेथे तिने बगरामच्या तुरुंगात एफबीआय अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला अमेरिकेत पाठवण्यात आले.
आफिया ही एक कथित सामाजिक कार्यकर्ती असून तिच्यावर केनियातील अमेरिकन दूतावासावर हल्ला केल्याचा आरोप आहे, या संस्थेशी ती संबंधित होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती