अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचे 45 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. तर अमेरिकन परंपरेप्रमाणे बायबलवर हात ठेवत अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांकडून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपख घेतली. शपथविधी सोहळ्यात उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही पदाची शपथ देण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष बराक ओबामा, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर यांच्यासह लाखो अमेरिकी नागरिक उपस्थित होते.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्याचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला.
वॉशिंग्टन : ही सत्ता माझी नाही नागरिकांची आहे. आपण सगळे मिळून देशाला बदलूया
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्टचा नारा.