इस्रायलला 2000 पौंड बॉम्ब पाठवण्याचा मार्ग मोकळा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ग्रीन सिग्नल

सोमवार, 27 जानेवारी 2025 (17:32 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला 2000 पौंड वजनाचे बॉम्ब पाठवण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वीच्या बिडेन सरकारने यावर बंदी घातली होती. गाझामधील नागरिकांना हानीपासून वाचवण्यासाठी बिडेन सरकारने इस्रायलला शक्तिशाली बॉम्ब पाठविण्यास बंदी घातली होती. सध्या गाझामध्ये युद्धविराम सुरू आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'इस्रायलने ऑर्डर केलेल्या अनेक वस्तू, ज्या बायडेनने पाठवल्या नव्हत्या, आता मार्गावर आहेत आणि जाण्यासाठी तयार आहेत.ट्रम्प प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की ते फक्त जड बॉम्बबद्दल बोलत होते.
ALSO READ: ट्रम्प यांच्या कठोरतेनंतर कोलंबियाचा यू-टर्न नागरिकांना अध्यक्षीय विमानानेआणणार
जो बिडेन यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायलला मोठ्या बॉम्बची डिलिव्हरी थांबवली होती जेणेकरून इस्त्रायलने दक्षिण गाझा शहर रफाहवर सर्वतोपरी हल्ला करू नये कारण यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे नुकसान होऊ शकते.

तथापि, अमेरिकेने जड बॉम्ब पाठवण्यास नकार देऊनही, इस्त्रायलने केवळ एक महिन्यानंतर रफाह ताब्यात घेतला. हमास आणि इस्रायलमध्ये युद्धविराम सुरू असताना इस्रायलला शक्तिशाली बॉम्ब पाठवण्यास ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती