व्लादिमीर पुतीन प्रत्येकवेळी बहुरुपींना बरोबर घेऊन फिरतात?

बुधवार, 11 जानेवारी 2023 (23:26 IST)
सोशल मीडिया आणि न्यूज वेबसाईटवर या गोष्टीची नेहमीच चर्चा होते की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नवीन वर्षाच्या दिवशी देशाला संबोधन करताना त्यांच्या आजूबाजूला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना उभं केलं.
याआधीही भाषण करताना त्यांनी असं केल्याचं बोललं जातं. मात्र याचा पुरावा काय?
यामागचं तथ्य जाणून घेण्यासाठी आम्ही चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरची मदत घेतली.
 
आधीही एका कार्यक्रमात पुतिन यांना अनेक लोकांनी घेरलं आहे असं दिसतं. मात्र हे लोक खरे दिसत नाहीत.
 
बीबीसी रशियाने केलेल्या पडताळणीत असं लक्षात आलं आहे की पुतिन सहज जाता जाता लोकांशी बोलतात. त्यात बहुतांश लोक स्थानिक अधिकारी होते.
अनेक सोशल मीडिया पोस्ट बरोबरच द सन आणि डेली मेल यांच्या दाव्यानुसार अनेक कार्यक्रमात पुतिन यांच्याबरोबर सोनेरी केसांची एक महिला दिसते. ती प्रत्येकवेळी वेगेवेगळ्या भूमिकेत असते.
 
ही महिला 2016 मध्ये एक कार्यक्रम आणि 2017 मध्ये एका फिशिंग ट्रिपमध्ये सहभागी झाली होती. या दोन्ही कार्यक्रमात पुतिन यांनी भाग घेतला होता.
 
युक्रेनमध्ये आलेल्या एका बातमीनुसार ही महिला फेडरल गार्ड्स सर्व्हिसची सदस्य असू शकते. हे दल उच्चपदस्थ नेत्यांच्या सुरक्षेची जबाबादारी घेते.
 
 2016 आणि 2017 मध्ये नववर्षाच्या संध्येला पुतिन यांच्या बरोबर असलेल्या महिलेचा चेहरा ओळखण्यासाठी फेशिअल रिक्गनिशन सॉफ्टवेअरची मदत घेतली. मात्र त्याचा रिझल्ट इतका चांगला नव्हता. आधीच्या इव्हेंटचा 29 टक्के आणि दुसऱ्याचा 28 टक्के होता.
 
ब्रॅडफर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर व्हिज्युअल कॉम्प्युटिंगचे डायरेक्टर प्रोफेसर हसन उगैल सांगतात, “जेव्हा या सॉफ्टवेअरच्या मदतीने चेहऱ्यातलं साम्य ओळखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असायला हा. तेव्हाच चेहऱ्यात साम्य आहे असं म्हणू शकतो.”
 
त्यानंतर आम्ही 2016 आणि 2017 मधील कार्यक्रमांची तुलना केली. त्याचा स्कोर 99.1 होता. या निकालावरून हा फोटो एकाच महिलेचा आहे हे पुरेसं स्पष्ट झालं होतं.
 
 सोनेरी केसांची मुलगी
या पोस्टला ट्विटरवर दहा लाख व्ह्युज मिळाले आहेत.
 
रशियाच्या प्रसारमाध्यमात या महिलेची ओळख लरिसा सरगुखिना म्हणून झाली आहे. नोवरागोड भागात झालेल्या दोन्ही कार्यक्रमात ही महिला दिसली होती.
 
ती रिजनल पार्लमेंटमध्ये युनायटेड रशिया पक्षाची खासदार आहे. ही महिला पुतिन यांची समर्थक आहे. जेव्हा आम्ही 2016 मध्ये एका बोटीवर घेतलेला या बाईचा फोटो आणि त्यांच्या पक्षाच्या अधिकृत वेबसाईवर घेतलेला फोटो जुळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात 99.8 टक्के साधर्म्य आढळलं.
 
सरगुखिनाचं नाव नोवरागोडमध्ये माशांचा व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीच्या संस्थापकाच्या यादीत तिचं नाव आहे.
 
जी महिला पुतिन यांच्या नवीन वर्षाच्या भाषणात जी महिला दिसली, तिचं नाव अन्ना सर्जिवलना सिदोरेंको असल्याचं रशियन प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. मिलिट्री डॉक्टर असलेल्या या बाईचा लष्करात कॅप्टनचा हुद्दा आहे.
या कार्यक्रमातील या महिलेच्या फोटोला रशिया इनवेस्तिया वर्तमानपत्राने पोस्ट केलेल्या एका व्हीडिओशी जुळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा 99.5 मिळतं जुळतं होतं.
 
तिचं नाव युक्रेनी इंटेलिजिन्स सर्व्हिसेस कडून प्रकाशित होणाऱ्या रशियन मिलिट्री रेजिमेंटच्या सदस्यांच्या सूचीत आहे.
 
पुतिन यांच्याबरोबर मासेमाऱ्यांच्या वेशात अससेल्या एका दलाचे फोटो आले होते. हा 2016 चा फोटो आहे.
 
या फोटोत दिसणारे पुरुष 2017 मध्ये चर्चच्या एका सर्व्हिस दरम्यान दिसले होते.
 
नाव आणि चर्चमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या पडताळणीसाठी जेव्हा आम्ही या सॉफ्टवेअरची मदत घेतली तेव्हा चार लोकांचा मॅचिंग स्कोर 99 टक्के निघाला. मग आम्ही आणखी माहिती काढून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.
अलेक्सी लेशेंको (फोटो नं 1)- पुतिन बरोबर दिसणारे मच्छिमार गटाचे नेते आहेत. हे आम्हाला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लक्षात आलं. त्याचबरोबर या दलाचं प्रोफाईलही इंटरनेटवर प्रकाशित झालं होतं.
 
येवेनगी लेशेंको (फोटो नं 5)- हा अलेक्सी यांचा मुलगा आहे. प्रोफाईलमध्ये त्यांनाही या दलाचा सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे.
 
अलेक्सी आणि येवेगनी यांचे सोशल मीडिया अकाऊंट आहेत. त्यावरून हे दोघं वडील मुलगा असल्याचं लक्षात आलं आहे.
 
सी प्रोफाईल नुसार हे दल स्थानिक शेतकी कंपनी इवरोखिमसेरविसमध्ये सामील आहेत. कंपनीचे उपसंचालक लारिसा सरगुखिना आहेत.
 
सर्गेई एलेक्जेंदरोव (फोटो नं 2) यांचा उल्लेख रशियन प्रसारमाध्यमांनी मासेमार म्हणून केला आहे. आम्ही त्यांचा सोशल मीडिया प्रोफाईल पाहिला तेव्हा ते एका मासेमाऱ्याच्या पोशाखात दिसत आहेत.
 
आम्हाला फोटो नं 4 मध्ये असललेल्या व्यक्तीचा सोशल मीडिया प्रोफाईल दिसलं नाही. त्यांनी स्वत:ला स्तावरोपोलचे शेतकरी म्हणून सादर केलं आहे.
 
मात्र जेव्हा या लोकांच्या चेहऱ्यांना दोन मासेमाऱ्यांच्या चेहऱ्याबरोबर जुळवला गेला तेव्हा मॅचिंग स्कोर आठ टक्केच होता.
 
आईसक्रीम विकणारी महिला
सोनेरी केसांच्या महिलांना पुतिन यांच्या कार्यक्रमातील संभावित अभिनेत्री असल्याचं सांगितलं जातंय, याची अनेक उदाहरणं आहेत.
 
त्यात एका महिलेचा आईसक्रीम विकतानाचे दोन फोटो आहेत. हे दोन फोटो 2017 आणि 2019 चे आहेत.
त्यात एका शो दरम्यान महिला पुतिन यांना आईसक्रीम देताना दिसत आहे.
 
हा फोटो एका बाजूने घेतला आहे आणि या फोटोचं रिझॉल्युशनही कमी आहे. यामुळे फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअरने ओळखणं कठीण जात आहे. त्यामुळे आम्ही याबाबत कोणतंही मत दिलेलं नाही.
मात्र आम्हाला 2019 मध्ये रशियन टेलिव्हिजनवर प्रसारित एक मुलाखत दिसली. त्यात एक महिला म्हणतेय की तिने दोन्ही वेळेला पुतिन यांना आईस्क्रीम दिलं होतं.
 
जर दोन्ही फोटोत एकच महिला असेल तर फारसं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण हे दोन्ही फोटो एकाच शोचे आहेत, जिथे पुतिन गेले होते.
 
लोकांचा दावा आहे की पुतिन यांना आईसक्रीम देणारी महिला स्वत:ला एअरोफ्लोटच्या स्टाफची सदस्य असल्याचं सांगून फोटो घेतले आहेत.
 
मात्र या प्रकरणात त्यांचा चेहरा ओळखण्यासाठी फेशिअल रिकग्निशन सॉफ्टवेअर फारसं विश्वासार्ह ठरलं नाही.
 
मे महिन्यात पुतिन यांनी ज्या जखमी सैनिकाची विचारपूस केली त्याचा फोटो एका फॅक्टरीत काढला होता.
 
जेव्हा हे दोन्ही चेहरे आम्ही जुळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्कोर फक्त 25 आला. याचाच अर्थ हे दोन्ही चेहरे सारखे नाहीत, असा होतो.
Published By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती