ही आहे जगातील महागडी आणि स्वस्त शहरे

शुक्रवार, 16 मार्च 2018 (15:00 IST)

'इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नं (ईआययू) आपल्या एका अहवालात देशातील सर्वात स्वस्त शहर कोणतं?  या प्रश्नांनाच उत्तर दिले आहे. 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग २०१८'च्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण आशियाई देश खासकरून भारत आणि पाकिस्तानातील शहर अधिक स्वस्त आहेत. सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत टॉप १० शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई तसंच नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे.जगातील सर्वात स्वस्त शहरामध्ये सीरियाची राजधानी दमिश्कचा प्रथम क्रमांक आहे. वर्ल्डवाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग एक द्विवार्षिक इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट सर्व्हे आहे. जगतील स्वस्त शहरे दमिश्क, कराकास, अल्माटी, लागोस, बंगळुरू, कराची,अल्जिअर्स,चेन्नई, बुखारेस्ट, नवी दिल्ली तर जगातील सर्वात महागडी शहरे आहेत सिंगापूर,पॅरिस, ज्युरिक, हाँगकाँग, ओस्लो, जेनेवा, सियोल, कोपेनहेगेन, तेल अवीव आणि सिडनी होय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती