चीन सरकारला सर्वात आधी कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचं निधन झालं आहे. दुर्दैवी बाब म्हणजे ज्या व्हायरबद्दल त्यांनी सरकारला चेतावणी देण्याचा प्रयत्न केला त्याचीच लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग यांनी चेतावणी दिल्यानंतरही सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला होता. १ फेब्रुवारी रोजी ली वेनलियांग यांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं. आणि अखेर पाच दिवसांनी त्यांचं निधन झालं.