करोनाचा चीनमध्ये हाहाकार! एकाच दिवशी २४२ जणांचा बळी

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (09:44 IST)
चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमध्ये आतापर्यंत १३०० हून अधिक बळी गेले आहेत. एकाच दिवसात २४२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
चीनमधील हुबेई प्रांतात करोनाचा उद्रेक कायम आहे. बुधवारी, करोनाची बाधा झालेले १४ हजार ८४० नवे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार जणांना करोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे वृत्त आहे. करोनामुळे चीनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. चीनमध्ये होणारी जागतिक मोबाइल काँग्रेसही करोनामुळे रद्द करण्यात आली आहे.
 
हुबेई प्रांतात आरोग्य व्यवस्थेबाबत हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने हुबेईचे प्रांत प्रमुख जियांग चाओलिआंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी शांघाईच्या महापौरांना जबाबदारी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती