चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. झिंजियांगमधील आरोग्य अधिकार्यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. एका कापड कारखान्यातील 17 वर्षीय तरुणी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र या मुलीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला यासंदर्भातील तपास आरोग्य अधिकारी करत असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रविवारी दुपारपर्यंत चीनमधील या भागातील 28 लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारपर्यंत या भागातील 47 लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकार्यांना आहे.