मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.