स्वित्झलँड- ताशी सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने धावणारा, सर्वांत वेगवान आणि चपळ प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता नामशेष होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण जगामध्ये आता केवळ 7100 चित्ते उरले असल्याचे एका नव्या संशोधनात समोर आले आहे.
सध्या असुरक्षित म्हणून गणल्या जाणार्या चित्याचे वर्गीकरण धोक्यात असलेला, चिंताजनक असे करणे आवश्यक आहे. चित्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या वतीने धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी तयार करण्यात येते. त्यामध्ये चित्ता सध्या असुरक्षित या वर्गामध्ये आहे. त्याला आता चिंताजनक म्हणून गणना करण्याची आता वेळ आली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.