कॅनबेरा संसदेमध्ये लॅरीसा वॉटर्स यांनी संसद सुरू असताना आपल्या बाळाला स्तनपान दिलं. संसद सुरू असताना अशा प्रकारची कृती करत लॅरीसा यांनी इतिहास रचला आहे. अशाप्रकारचं धाडस करणारी ही देशातील पहिली महिला ठरली होती. संसदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा होत असते. अनेक महत्त्वाचे निर्णय याठिकाणी घेतले जातात. यावेळी आपण हजर असणं गरजेचं आहे, पण आपल्या बाळाकडेही दुर्लक्ष व्हायला नको या हेतून त्यांनी न लाजता भर संसदेत ही गोष्ट केली.