पाकिस्तान: पेशावर मशिदीत आत्मघाती स्फोट, किमान 30 ठार; 50 जखमी

शुक्रवार, 4 मार्च 2022 (15:45 IST)
पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत.
   
मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना प्रत्यक्षदर्शींनी दिली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी होती, अचानक गर्दीतील एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. स्फोटापूर्वी गोळीबाराचा आवाजही ऐकू आला.
 
या स्फोटामागे कोणाचा हात आहे याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांचे पथक स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहे. स्थानिकांनी सांगितले की, या परिसरात अनेक बाजारपेठा आहेत आणि ते सहसा शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी खचाखच भरलेले असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती