एक लहान मुलगी जन्माला आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी कोट्याधीश झाली. आलिशान वाड्या, महागड्या गाड्या, नोकर-चाकर हे सगळे तिच्या नावावर होते हे सर्व तिला तिच्या श्रीमंत आजोबांकडून मिळाले. ज्याने आपल्या नातीच्या जन्माच्या 48 तासांनंतरच तिच्यावर पैशांचा वर्षाव केला. आजोबांनी नातीला 50कोटींहून अधिक रुपयांचा ट्रस्ट फंडही भेट दिला आहे.
वृत्तानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या बॅरी ड्रेविट-बार्लो यांच्या मुलीने नुकतेच एका मुलीला जन्म दिला आहे. नातीच्या जन्मानंतर बॅरीने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला. तसेच नातीला करोडो रुपयांचा वाडा आणि ट्रस्ट फंड भेट दिला.
आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही आमच्या नातीला गिफ्ट्स दिले आहेत.
बॅरीने सांगितले की, त्याने गेल्या आठवड्यात हा वाडा विकत घेतला होता. तो त्याच्या नातीनुसार त्याचे इंटीरियर डिझाइन करून घेईल. कारण आता हा वाडा नातीचा झाला आहे.