Apple vs Twitter: Apple ने आपल्या App Store वरून 'Twitter' काढून टाकण्याची धमकी देण्याचा एलन मस्कचा आरोप

बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (13:42 IST)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून काही नवीन वाद चव्हाट्यावर येत आहेत. यावेळी प्रकरण आयफोन बनवणाऱ्या अॅपलचे आहे. खरं तर, ऍपलने आपल्या अॅप स्टोअरमधून 'ट्विटर' काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप एलोन मस्कने केला आहे. मस्क म्हणाले की, अॅपल ट्विटरला ब्लॉक करण्यासाठी सर्व प्रकारे दबाव आणत आहे. अगदी आयफोन निर्मात्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणे बंद केले आहे
 
अॅलन मस्कने आरोप केला आहे की अॅपल कंटेंट मॉडरेशनच्या मागणीवर ट्विटरवर दबाव आणत आहे. अॅपलने केलेली कारवाई असामान्य नाही, कारण इतर कंपन्यांवरही नियम लादण्याचे वारंवार प्रयत्न झाले आहेत. या अंतर्गत त्याने गॅब आणि पार्लर सारखे अॅप्स काढून टाकले आहेत. 
 
एका ट्विटमध्ये मस्कने अॅपल अॅप स्टोअरवरून इतर अॅप्स डाउनलोड करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरही टीका केली आहे. मस्कने लिहिले की अॅपल आपल्या अॅप स्टोअरमधून खरेदी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर गुप्तपणे 30 टक्के कर लावते.  
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती