अँजेला मर्कल चौथ्यांदा निवडून येण्यास उत्सुक

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (09:08 IST)
जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्कल या 17 वर्षांपासून त्या जर्मनीच्या अध्यक्षपदावर आहेत. 24 सप्टेंबरला जर्मनीत निवडणुका आहेत आणि यावेळीही त्यांच्या ख्रिश्‍चन डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मर्कलच आहेत. त्यामुळे चौथ्या वेळेस जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवडून येण्यास त्या उत्सुक आहेत.
 
मर्कल यांच्या या कार्यकाळातही अर्थव्यवस्था चांगली आहे. बेरोजगारी 11.2 टक्‍क्‍यांवरून 3.8 टक्‍क्‍यांवर आलीय. ब्रेक्‍झिटनंतर बसलेल्या हादऱ्यांचा परिणाम जर्मनीवर तुलनेने कमी झाला आहे. तिथला समाज जास्त उदारमतवादी झाला आहे.
 
समलैंगिक विवाहांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. युरोपच्या अनेक देशांमध्ये समलैंगिक विवाहांना परवानगी आहे. इतके दिवस ती जर्मनीत नव्हती. मर्कल यांच्या पक्षाचाही त्याला विरोध होता. मग मर्कल यांनी या मुद्द्यावर सार्वमत घेतले. लोकांचा कल होता समलैंगिक विवाहांच्या बाजूने. मर्कल यांनी स्वतः लक्ष घालून तिथल्या संसदेत कायदा मंजूर करून घेतला. यामुळे त्यांची तरुणांमधली लोकप्रियता कमालीची वाढली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती