अबब पांढरे जिराफ

शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:48 IST)

केनियात अतिशय दुर्मिळ असे पांढरे जिराफ आढळले आहेत. एक मादी जिराफ आणि तिचे पिल्लू असे आढळलं आहे. अशा प्रकारच्या जीराफास अल्बिना जिराफ म्हटले जाते. अल्बिना नावाने ओळखले जाणारे हे पांढेर जिराफ सर्वात प्रथम आफ्रिकेत उदयास आले. केनियातील एका कुटुंबाला हे जिराफ आधी जूनमध्ये दिसले होते. अनुवंशिक गुणांमुळे म्हणजेच ‘ल्यूकिझम’मुळे या जिराफांचा रंग बदलला असल्याचे म्हटले जाते. यांच्या त्वचेतील पेशींमधून रंग कमी होत जातो. मात्र, ल्यूकिझमचा डोळ्यांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे यांचे डोळे मात्र इतर जिराफ सारखे असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती