एखाद्यावर लक्ष्मी कधी प्रसन्न होईल हे सांगता येत नाही. पाकिस्तानातील कराची शहरातील एक मच्छीमार अनेक औषधी गुणधर्म असलेल्या दुर्मिळ माशाचा लिलाव करून रातोरात करोडपती झाला. इब्राहिम हैदरी गावातील रहिवासी हाजी बलोच आणि त्यांच्या टीमने सोमवारी अरबी समुद्रातून स्थानिक बोलीतील 'गोल्डन फिश' किंवा 'शावा ' पकडला. शुक्रवारी सकाळी कराची बंदरावर झालेल्या लिलावात हा मासा सुमारे 7 कोटी पाकिस्तानी रुपयांना विकला गेला.