पाकिस्तान सरकारने गुरुवारी मालीर तुरुंगातून 80 भारतीय मच्छिमारांची सुटका केली. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत ते म्हणाले, भारतीय मच्छिमारांना अल्लामा इक्बाल एक्सप्रेस ट्रेनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत बसवण्यात आले होते, ते 10 नोव्हेंबर शुक्रवारी रोजी लाहोरला पोहोचतील. त्यानंतर वाघा बॉर्डरवर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
भारतीय मच्छिमारांना लाहोरला जाण्याची व्यवस्था करणाऱ्या ईधी वेल्फेअर ट्रस्टचे फैसल एधी म्हणाले की, गरीब पार्श्वभूमीतील भारतीय मच्छिमारांना घरी परतताना विशेष आनंद झाला. लवकरच ते आपल्या कुटुंबात सामील होतील याचा त्यांना आनंद आहे.