ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याचं डिझाईन बनवलं असून हे विमान ध्वनी आणि वायू प्रदूषण करत नसल्याचा दावाही केला आहे. हे एअरक्राफ्ट बनवण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. हेलिअम गॅसवर उडणाऱ्या या विमानाचा काही भाग विमानाचा, काही भाग जहाजाचा तर काही भाग हेलिकॉप्टरचा आहे. हे विमान तीन आठवड्यांपर्यंत आकाशात प्रवास करु शकतं.