सोमालियामध्ये सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेच्या ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 17 जण ठार झाले असून तीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या अल-शबाब या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका आत्मघातकी हल्लेखोराने सोमालियामधील स्थानिक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोट घडवून आणला.