वणवा विझविताना 11 जणांचा मृत्यू

भाषा

मंगळवार, 4 मार्च 2008 (21:46 IST)
चीनमधील दोन वेगवेळ्या प्रांतातील जंगलांना काल लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्न करत असताना चार गावकर्‍यांसह एका वन मजदुराचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले.

दक्षिण फुजियान प्रांतात जंगलाला लागलेली आग विझविण्यासाठी हे गावकरी गेले होते, असे या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास या लोकांना यश आले असे सरकारी वृत्त एजेंन्सी 'शिन्हुआ' च्या अधिकार्‍यांनी सांगितले.

रविवारी दुसरी घटना मध्य हुनान प्रांतातील जंगलाला लागलेली आग विझविण्‍याच्या प्रयत्न करत असताना सहा गावकर्‍यांचा मृत्यू झाला.


वेबदुनिया वर वाचा