रशियाकडून ३०० दहशतवाद्यांना कंठस्रान

शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (11:17 IST)
रशियाने इसिसच्या विरोधात सीरियाच्या राक्का प्रांतात जेट विमानाद्वारे केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० दहशतवाद्यांसह इसिसचे दोन कमांडर मारले गेल्याचे वृत्त आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सीरियात केलेल्या या हल्ल्यात मोठे यश मिळाले आहे. रशियाने दहा दिवसांपासून इसिसच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

वेबदुनिया वर वाचा