मेक्सिकोचे राष्ट्राध्क्ष बनले मोदींचे सारथी

शुक्रवार, 10 जून 2016 (09:14 IST)
पाच दिवसांच्या विदेश दौर्‍याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक्सिकोमध्ये दाखल झाले आहेत. तिथे पोहोचताच पंतप्रधानांनी आण्विक पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाच्या दाव्याला पाठिंबा दिल्याबद्दल मेक्सिकोचे विशेष आभार मानले. पंतप्रधानांनी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना नीटो यांच्यासह संयुक्त निवेदनही जारी केले आहे.
 
भारतीय वेळेनुसार मोदी पहाटे 4:42 वाजता मेक्सिको सिटीत दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष नीटो यांनी खास टिट करून पंतप्रधानांचे स्वागत केले. ‘मेक्सिकोत आपले स्वागत आहे. हा आमच्यासाठी मोठा सन्मानाचा क्षण आहे. आपली ही भेट नक्की सुङ्खळ, संपूर्ण ठरेल याचा मला विश्वास आहे’,असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले. 
 
चीन पडला एकाकी 
48 सदस्यसंख्या असलेल्या ‘एनएसजी’तील भारताच्या सदस्यत्वाला अमेरिका, स्वीत्झर्लडनंतर मेक्सिकोनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारताचा दावा आणखी बळकट झाला असताना या मुद्दय़ावर भारताच्या सदस्यत्वाला विरोध करणारा चीन मात्र एकाकी पडताना दिसत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा