मॅक्सिकोत संघर्षात 14 ठार

वेबदुनिया

रविवार, 6 डिसेंबर 2009 (11:05 IST)
मॅक्सिकोच्या नुएवो प्रांतात पोलिस आणि तस्करांमध्ये झालेल्या चकमकीत 14 जण मारले गेले. शुक्रवारी दुपारी जुआरेज भागात झालेल्या दोन चकमकीत 12 जणांचा मृत्यू झाला, लोस जेताजचा प्रमुखही चकमकीत मारला गेला.

दुसरीकडे अज्ञात व्यक्तींनी गस्त घालणाऱ्या दोघा पोलिसांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर प्रांतातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

वेबदुनिया वर वाचा