बलुचिस्तानमध्ये फडकला तिरंगा

शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:56 IST)
पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेल्या बलूची लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली. बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. अकबर बुगती यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकले आहेत.

स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता.

मोदींच्या विधानामुळे आणि भारताच्या नव्या भूमिकेमुळे आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटेल, अशी आशा निर्माण झाल्याचंही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक नेते ब्रह्मदाग बुगती म्हणाले.

बलुचिस्तानमध्ये मागील चार दिवसांपासून पाकिस्तानकडून होणा-या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. यावेळी आक्रमक झालेल्या बलूची लोकांनी पाकिस्तानचा झेंडाही तुडवला.

वेबदुनिया वर वाचा