तसेच सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली लहान मुलांवर हिंदी लादण्याचा सरकारचा प्रयत्न मराठी लोकांच्या एकतेने हाणून पाडला. काल २९ जून २०२५ रोजी सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. हा मराठी लोकांच्या एकतेचा विजय आहे आणि मी यासाठी सर्व मराठी लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.” राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच ५ जुलै रोजी विजय रॅलीची घोषणा करताना राज म्हणाले, “५ तारखेला विजय रॅली होईल. या रॅलीत झेंडा असणार नाही, ती मराठी लोकांची रॅली असेल.