बकरी चोरल्याच्या आरोपवरून हात तोडले

शनिवार, 26 जुलै 2014 (11:03 IST)
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका 10 वर्षीय मुलाचे हात कलम करण्यात आले आहेत. त्याच्यावर बकरी चोरल्याचा आरोप होता. एका जमीनदाराने या मुलाचे हात कलम केले. पोलिसांनी या जमीनदाराला अटक केली असून येथील कोर्टाने त्याला 10 दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहनवाज शरीफ यांनी पोलिस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी उशीरा कारवाई केली होती. याची मुख्यमंत्री शरीफ यांनी दखल घेतली आहे. 
 
जमिनदार मुस्तफा गौस याने नासिर इकबाल यांचा मुलगा तबस्सुम याचे अपहरण केले. त्याने बकरी चोरली असा आरोप करत त्याचे हात तोडले. तबस्सुम याच्यावर अजीज भट्टी शहीद रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वेबदुनिया वर वाचा