नेपाळला भारताचे 10 हजार कोटींचे सहकार्य

सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (07:48 IST)
नेपाळच्या प्राथमिक विकासासाठी दहा हजार कोटी नेपाळी रुपयांचे सहकार्य करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

नेपाळ या बुद्धाच्या भूमीतून जगाला हिंसेतून मुक्त होण्याची दिशा मिळेल. जेव्हा संविधानाची निर्मिती होईल तो दिवस जगामध्ये उल्लेखनीय ठरेल, याची मला खात्री आहे, असेही मोदी म्हणाले.

नेपाळच्या संसदेमध्ये भाषण करताना मोदी यांनी वरील मत व्यक्त केले. नेपाळी भाषेतून भाषणाला सुरुवात करीत मोदींनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

ते म्हणाले, ‘येथे भाषण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेला मी पहिला पाहुणा आहे. हा सर्व भारतीयांचा सन्मान आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईरला यांच्यादरम्यान रविवारी तीन करारावर सह्या झाल्या. या करारानुसार भारत नेपाळला आयोडिनयुक्त मीठ पुरविण्यासाठी 69 दशलक्ष रुपयांची  मदत देणार आहे. रक्तात आयोडिन कमी असल्यामुळे नेपाळी नागरिकामध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. भारताकडून मिळणार्‍या  या मदतीमुळे त्यांचे आरोग्य सुधारणला मदत होणार आहे.

रविवारी सकाळी येथे आगमन झाल्यावर मोदी यांनी येथील दरबार हॉलमध्ये कोईराला यांची भेट घेतली. नेपाळमधील शांतता प्रक्रिया, घटना तयार करण्याची प्रक्रिाया व आर्थिक सुधारणा याबाबत दोघा पंतप्रधानांमध्ये सविस्तार चर्चा झाल्याचे नेपाळ सरकारच्या सूत्राकडून सांगणत आले. आयोडियुक्त मीठ पुरवठय़ामुळे नेपाळमधील लहान मुलामधील गोवर-कांजण आदी आजारांना आळा बसणार आहे तर दुसर्याठ करारामुळे पंचसरोवर बहुउद्देशीय प्रकल्प पूर्ण करणला भारत आर्थिक मदत देणार असल्याचे हिमालयन  टाइम्सने सांगितले आहे. तिसर्याप करारानुसार दूरदर्शन व माध्यम क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी भारत नेपाळला भरीव मदत करणार आहे.  

नरेंद्र मोदी यांचे काठमांडूच्या त्रिभवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यासाठी नेपाळचे दोघे उपपंतप्रधान रामदेव गौतम व प्रकाश मान हे उपस्थित होते. गेल्या सतरा वर्षात नेपाळला भेट देणारे मोदी हे भारतीय पंतप्रधान असल्यामुळे त्यांचे स्वागतसाठी नेपाळस्थित भारतीयांनी विमानतळावर गर्दी केली होती. भारतीय मुले भारत व नेपाळ यांचे कागदी ध्वज फडकावित भारत-नेपाळ मैत्रीच्या घोषणा देत होते. नेपाळचे परराष्ट्रमंत्री महेंद्र पांडे यांनी मोदी यांची भेट घेऊन उभ्या देशादरम्यान जलविद्युत प्रकल्प, वपार व सुरक्षा या बाबींवर सविस्तर चर्चा केली.

नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या निवेदनामध्ये उभ्या देशामधील संबंध बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशादरम्यानचे व्यापार, उद्योग व सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी भारत उत्सुक असल्याची ग्वाही मोदी यांनी दिल्याबद्दल नेपाळ सरकारने समाधान व्यक्त  केले आहे.

वेबदुनिया वर वाचा