जपानमध्ये नरेंद्र मोदी बनले शिक्षक!

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (14:21 IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौ-यावर आहेत. नरेंद्र मोदींनी टोकियामध्ये एका शाळेचाही दौरा केला. येथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोदी जपानच्या शिक्षणपद्धतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याचे तोंडभरुन कौतुकही केले. जपानी भाषा शिकायला भारत उत्सुक असल्याचे यावेळा मोदींनी म्हणाले. जपानी शिक्षकांना भारतात येण्याचे मोदींनी आमंत्रणही दिले आहे. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी जपानच्या उद्योगपतींना संबोधित केले. जपान चेंबर ऑफ कॉमर्समध्ये हिंदीतून केलेल्या भाषणात मोदींनी दोन्ही देशांत सहकार्य वाढवण्याचा मुद्दा मांडला. मोदींनी आपल्या सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा उल्लेख करत सकारात्मक सुरुवात झाल्याचे सांगितले. मोदी आज (सोमवारी)  पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.
 
मोदींनी आपल्या भाषणात जपानने भारताला भरपूर सहकार्य केल्याचे सांगितले. ग्रीन एनर्जी आणि क्लीन एनर्जीसाठी जपानक़डून सहकार्य घेऊ आणि सहकार्य करू असे मोदी म्हणाले. स्किल डेव्हलपमेंटच्या दिशेने भारत जपानच्या बरोबरीने काम करण्यास इच्छुक आहे. 21 वे शतक आशिया खंडासाठी उज्ज्वल पहाट घेऊन येणार असल्याचे मोदी म्हणाले. .त्यामुळे भारत जपान सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांतील नाते खूप जुने आहे. त्यामुळे अपेक्षा स्वाभाविक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा