आणखी एक पृथ्वी सापडली!

शनिवार, 25 जुलै 2015 (13:45 IST)
पृथ्वीसारख्याच आकाराचा आणखी एक ग्रह अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेला सापडला आहे. हा ग्रह खडकाळ आहे. 

पृथ्वीबाहेरील ग्रहावर जीवसृष्टी आहे का, याबाबत संशोधन सुरु आहे. यातील महत्वाचे संशोधन म्हणून या ग्रहाकडे पाहिले जात आहे. २००९ साली हे संशोधन सुरू झाले, त्याअंतर्गत पृथ्वीबाहेर राहण्यासारखे ग्रह शोधले जात आहेत. केपलर दुर्बिणीने शोधलेले बहुतांश ग्रह वायूमय अवस्थेत होते, गोल्डीलॉक झोनमध्ये असणारे आठ ग्रह पृथ्वीपेक्षा कमी आकाराचे होते. पृथ्वीसारखाच व पृथ्वीच्या आकाराचा असा ग्रह प्रथमच मिळाला असून नासा त्याची माहिती देणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा