'सीमेवरील गाव खाली करण्‍याचे आदेश नाहीत'

वेबदुनिया

बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:43 IST)
भारत-पाकिस्‍तान सीमेवर असलेले गाव खाली करण्‍याचे आदेश अद्याप दिले गेले नसल्‍याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) स्‍पष्‍ट केले आहे. बीएसएफचे महानिर्देशक एम. एल. कुमावत यांनी सांगितले, की सीमेवर स्थिती सामान्‍य असून बीएसएफ कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्‍यासाठी तयार आहे. सिमेवर पाकिस्‍तानी रेंजर्सच्‍या वेगवान हालचाली सुरू असल्‍याच्‍या घटनेस मात्र त्‍यांनी दुजोरा दिला.

वेबदुनिया वर वाचा