भारताची ताकद

वेबदुनिया

बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:42 IST)
भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम

अस्त्र
हवेतून हवेत मारा करणार्‍या आणि 110 किलोमीटरपर्यंत मजल असलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राची भारताने 13 सप्टेंबर 2008 ला ओरिसाच्या चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 15 किलोग्रॅमपर्यंतची युद्ध सामग्री आपल्यासोबत नेऊ शकते. शत्रूच्या तळांवर अचूक मारा करण्याची क्षमता याची आहे. सुपरसॉनिक विमानांच्या गतीने जाणार्‍या या क्षेपणास्त्राची खासियत म्हणजे ते विमानभेदी आहे.

बीवीआर अर्थात बियॉड व्हिज्यूअल रेंज असलेल्या अधुनिक क्षेपणास्त्र भारताच्या भात्यात आहेत.

पृथ्वी 1, 2 , 3
जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
150 ते 2500 किलोमीटरची मारक क्षमता
500 ते 1000 किलोची स्फोटकं यात समाविष्ट
भारतीय रुपयांमध्ये याची किंमत तीन कोटीहून अधिक

आकाश
जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
मारक क्षमता 25 किलोमीटर
55 किलो स्फोटकांची क्षमता
सद्यस्थितीत अत्यंत विकसित आणि यशस्वी

त्रिशूल
जमिनीवरुन हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र
500 मीटर ते 9 किलोमीटर मारक क्षमता
15 किलोपर्यंतची क्षेपणास्त्र समाविष्ट
चाचणी : 30 वेळा यशस्वी

नाग
रणगाड्यांना भेदणारे क्षेपणास्त्र
पाच किलोमीटरची मारक क्षमता
चाचणी : 25 वेळा यशस्वी

अग्नी 1 ते 5
मध्यम ते लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र
5000 किलोमीटरची मारक क्षमता
25 वेळा यशस्वी चाचणी
आधुनिक आणि विकसीत क्षेपणास्त्र

ब्राह्मोस
जमिनीवरुन जमिनीवर तसेच युद्धनौकेवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
मारक क्षमता जमिनीवरुन 290 किलोमीटर आणि युद्धनौकेवरून 14 किलोमीटरपर्यंत
200 किलो स्फोटके नेण्याची क्षमता
तीनवेळा यशस्वी चाचणी.

वेबदुनिया वर वाचा