स्वातंत्र्य दिन 2021 विशेष : लहान मुलांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगा,राष्ट्रीय संस्कारांचे गुण मुलांमध्ये रुजवा

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (16:56 IST)
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. यंदाच्या वर्षी आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.आपण दरवर्षी हा दिन साजरा करतो परंतु आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्यताचे महत्त्व आणि अर्थ सांगायला विसरतो.
 
लहान लहान बाळ गोपाळ आपल्या हातात तिरंगा झेंडा घेऊन शाळेत जातात.परंतु स्वातंत्र्य दिन म्हणजे काय ?त्यांना हे माहीतच नसत.मुलांना या विषयी माहिती देण्यासाठी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शूरांनी आपले प्राण दिले आहेत.त्यांच्या बद्दल देखील माहिती सांगा.त्यांच्या साठी ही माहिती असणं गरजेचं आहे. 
 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बिटिशांशी लढणारे अनेक वीर आहे ज्यांनी आपले देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण दिले.देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी हिंसा आणि अहिंसाचा मार्ग अवलंबवावा लागला.परंतु आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमी अहिंसाचा मार्ग अवलंबवला.आपल्या मुलांना अशा शूरांची माहिती आवर्जून सांगा. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिले.चला तर मग अशा शूरवीरांबद्दल माहिती जाणून घेऊ या.
 
1 महात्मा गांधी -महात्मा गांधी नेहमी अहिंसेच्या मार्गावर चालले.त्यांनी आपल्या हातात कधीही कोणतेही शस्त्र घेतले नाही.त्यांनी नेहमी चुकीच्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवला.ते शांततेत आंदोलन करून निषेध करायचे.
 
एकेकाळी मिठावर देखील कर लावायचे.गांधीजींनी त्याचा विरोध केला.आणि हा कायदा संपविला.या सह गांधीजींनी समाजातील वाईट गोष्टींना देखील संपवण्याच्या प्रयत्न केला. 
 
2  राणी लक्ष्मी बाई - 'खूब लडी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी' ही कविता सर्वांची ऐकली आहे.आपल्याला हे माहीत आहे का झाशीची राणी कोण होती?राणी लक्ष्मीबाईंनीच देशाला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रेजांशी लढा दिला. 1858 च्या बंडात लक्ष्मीबाई स्वातंत्र्यासाठी लढताना शहीद झाल्या.
 
3 - भगतसिंग - ज्यांनी ब्रिटिशांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. देशाला मुक्त करण्यासाठी ते अगदी हसत -हसत फासावर चढले.
 
4 नेताजी सुभाषचंद्र बोस - तरुणांमध्ये स्वातंत्र्याची भावना भरण्यासाठी उत्साही घोषणा दिल्या. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. त्यांच्या या घोषणेने तरुणांमध्ये खूप उत्साह भरला होता. ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते. आणि जनता त्यांना प्रेमाने नेताजी म्हणत असे.
 
5 बहादूर शाह जफर - 1857 च्या लढाई दरम्यान त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात मोर्चा उघडला.
 
6 शिवराम राजगुरू -ते एक महान क्रांतिकारक होते. ते भगतसिंगचे साथीदार होते.ते  तरुणांना ब्रिटिशांशी लढा करण्यासाठी तयार करायचे.
 
ही फक्त काही धाडसी शूरवीरांची नावे आहेत. पण अनेक क्रांतिकारकांनी देशाला मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते. देशसेवेसाठी. त्यांना भारतमातेचा शूर मुलगा असे म्हटले जाते. देशासाठी काहीतरी करण्याची भावना लहान मुलांमध्ये तेव्हा उद्भवेल. जेव्हा त्यांना या संदर्भात माहिती दिली जाईल.  
 
मुलांच्या मनात देशासाठी काहीतरी चांगले करण्याची,समर्पण करण्याच्या भावनेला वाढवा आणि त्या दिशेनेच वाटचाल करा.हे येत्या काळात एक महान हेतू साध्य करू शकते. जे आपल्याला कठोर परिश्रम करण्यास आणि तुमच्या कामात अधिक चांगले करण्यास प्रेरित करेल.
 
मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित करा. त्यांना देशातील सैनिकांबद्दल सांगा. बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत, मुलांनाही त्यांच्याबद्दल सांगा. जेणे करून त्यांच्यामध्ये कुतूहल वाढेल.असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना पाहून त्यांना खूप काही शिकायला मिळते. बालपण ही योग्य वेळ आहे जेव्हा राष्ट्रीय संस्कारांचे गुण मुलांमध्ये रुजवले जाऊ शकतात.त्यांना वीर रसाच्या देशभक्तीच्या कविता पाठ करण्यास सांगा.
 
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे देशभक्तीची पुस्तके स्वतः वाचून त्यांना ऐकवा.देशभक्तीचे  गाणे आपण म्हणा.म्हणजे आपल्याला बघून ते देखील म्हणतील.आपण स्वतः किती देशभक्त आहात आधी हे बघा नंतर मग मुलांकडून अपेक्षा करा. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती