या संदर्भात एका वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत मुलीचे नाव इंडिया ठेवण्याचे कारण पत्नी एल्सा पातकी असल्याचे क्रिशने म्हटले. तो म्हणाला, काही काळ माझी पत्नी भारतात राहिली होती. तिने याचमुळे मुलीचे नाव इंडिया ठेवले.
क्रिश गेल्यावर्षी नेटफ्लिक्सच्या ढाका प्रोजेक्टसाठी भारतात आला होता. अहमदाबाद आणि मुंबईमध्ये त्याने चित्रीकरण केले. क्रिश म्हणाला की, चाहते दिग्दर्शकाच्या प्रत्येक कटनंतर जोरजोरात ओरडायचे. तेव्हा आम्हाला रॉकस्टार असल्यासारखे वाटत होते. ज्या पद्धतीने लोक आमचा जयजयकार करायचे ते पाहून आम्हालाही आनंद झाला.
क्रिशला मुलाखतीदरम्यान बॉलिवूडमध्ये काम करणार का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने, माझी याबाबत बोलणी सुरू असून मी कदाचित काम करूही शकेन. मेन इन ब्लॅक सीरिजच्या मेन इन ब्लॅक- इंटरनॅशनलमध्ये काम करण्यास क्रिश फार उत्सुक होता. भारतात हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.