तिसर्‍या मुलीचीचे नैराश्य, आईनेच केली चिमुकलीची हत्या

एका धक्कादायक घटनेत नकोशी मुलीला आईनेच गळा आवळून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. नाशिकच्या आडगावमध्ये महिलेला तिसऱ्यांदा मुलगी झाली. तिसरीही मुलगी झाल्याच्या नैराश्यातून सख्ख्या आईनेच आपल्या दहा दिवसाच्या चिमुकलीची हत्या केली. 
 
महिलेच्या पतीने याबद्दल तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अनुजा काळे हिला अटक केली आहे. नाशिकच्या आडगाव येथील वृंदावन नगरमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. 
 
अनुजा नावाच्या या महिलेने एका खासगी रुग्णालयात हे घाणेरडे कृत्य केले. काळे दंपतीला या पूर्वी दोन मुली होत्या आणि तिसरी मुलगी झाल्यावर आई निराश झाली त्यामुळेच आईनेच तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  
 
संशय येण्याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वीच महिलेच्या 12 दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा 10 दिवसांच्या मुलीचाही मृत्यू झाला. तसेच पोस्टमार्टमध्ये दहा दिवसांच्या चिमुकलीची डोक्यावर मारुन व गळा आवळून हत्या केल्याचे कळून आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती