सनातन धर्मात रंगपंचमीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतात हा सण मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जात असल्यामुळे या सणाला रंगपंचमी, श्री पंचमी किंवा देव पंचमी असे म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी हा सण 30 मार्च रोजी साजरा केला जाईल.
2. रंगपंचमीला देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करावी. या दिवशी लक्ष्मीला लाल गुलाल, कमळगट्टा आणि कमळाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपत्ती वाढते.