रंगोत्सव

सोमवार, 29 मार्च 2021 (13:18 IST)
मैफिल गान लकेरीची
अनुभूती संगीताची
नेहेमीच रंगावी 
 
ओंजळ रंगांची
रंगीबेरंगी नात्याची
नेहेमीच फुलावी  
 
मेजवानी हास्याची
आप्त अन मैत्रीची
नेहेमीच असावी 
 
निर्मळ आनंदाची 
रंग अन गुलालाची
मुक्त उधळण व्हावी 
 
होळीच्या रंगीत शुभेच्छा
- माधवी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती