देवराज इंद्राच्या मत्सर स्वभावामुळे ''कुंभकर्णाला'' निद्रेचं वरदान लाभले

शनिवार, 18 एप्रिल 2020 (11:49 IST)
रामायणातील गूढ कथांमध्ये एक कथा नेहमीच झोपलेल्या कुंभकर्णाचीही आहे. कुंभकर्ण हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याचे शरीर अवाढव्य होते. तो अती भक्षक होता. रामायणात अशी आख्यायिका आहे की कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि फक्त एक दिवस खाण्यासाठी उठत होता. आहार घेतल्यावर परत सहा महिन्यासाठी झोपी जायचा. 
 
आपणास ठाऊक आहे का की कुंभकर्णाला झोपण्याची सवय कशी काय पडली ?
एकदा यज्ञाच्या शेवटी प्रजापती ब्रह्माने कुंभकर्णाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. देवराज इंद्र घाबरले की कुंभकर्णाने वरदानात इंद्रासन मागितले तर मग माझे कसे होणार ? अश्या भीतीपोटी त्यांनी देवी सरस्वतीला कुंभकर्णाच्या जिव्हेवर जाऊन बसण्याची विनवणी केली. इंद्राच्या विनवणीचा मान राखून देवी सरस्वती कुंभकर्णाच्या जिव्हावर आरूढ झाली आणि वर मागताना कुंभकर्णाच्या तोंडातून इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन वदले गेले. अशा प्रकारे देवराज इंद्राच्या हेव्यामुळे कुंभकर्णाला निद्रासन मिळाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती