हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते. गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे, पण केवळ गायच नाही तर गायीशी संबंधित पाच गोष्टींनाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मुख्यतः गायीपासून मिळणाऱ्या पाच गोष्टी धार्मिक विधी, पूजा, शुभ कार्यासाठी आवश्यक मानल्या जातात. गाईशी संबंधित या पाच गोष्टींना पंचगव्य म्हणतात , ज्यामध्ये गाईचे दूध, दही, तूप-लोणी, गोमूत्र आणि शेण यांचा समावेश होतो.
पंचगव्य म्हणजे काय
गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
पंचगव्याचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरांपर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभ कार्य, पूजा, विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिले जाते. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो. जाणून घ्या पंचगव्यातील या पाच गोष्टींचे महत्त्व.