चांगला पती मिळावा यासाठी कुमारिकांनी करावयाचे व्रत

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (14:55 IST)
एका रविवारी सायंकाळी पावशेर अच्छेर किंवा त्याहून कमी दूध तापवून विरजावे. सोमवारी सकाळी स्नान करुन पांढरे वस्त्र परिधान करावे. केसात पांढर्‍या रंगाचे फुले माळावीत. प्रसन्न चित्ताने ते दही रवीने घुसळून त्याचे निघेल तेवढे लोणी एका नैवेद्याच्या वाटीत ठेवावे व त्यावर दोन तुळशीपत्रे व खडीसाखरेचे 2-4 खडे ठेवून मनोमनी गोपाळकृष्णास नैवेद्य दाखवावा. नंतर प्रार्थना करावी- हे गाळपकृष्णा मी तुझी लेक आहे. माझा विवाह उत्तम रीतीने पार पडून मला पतिसुख लाभण्यासाठी व सौभाग्यासाठी ती मुला हा नैवेद्य अर्पण करत आहे. तो गोड मानून माझी मनोकामना पूर्ण करावीस अशी प्रार्थना आहे.
 
नंतर लोणी, साखर स्वत: खावी, इतरांस देऊ नये. असे चार सोमवार व्रत करावे. चौथ्या सोमवारी वरीलप्रमाणेच नैवेद्य दाखवावा. नंतर गोग्रास घालावा व कुत्र्याला चतकोर अशी भाकरी अगर पोळी टाकावी. शक्य तो पक्ष्यांसाठी भाकरी-पोळीचे तुकडे करुन टाकावेत. त्या दिवशी भोजनास इतर लोकांस बोलावू नये. मासिक पाळीची अडचण निर्माण झाल्यास पुढील सोमवारी व्रत करावे. परत चार सोमवार व्रत करण्याची गरज नाही.
 
भगवान कृष्णाला अशा रीतीने प्रसन्न केल्यावर तो परमात्मा मुलीच्या मागे उभा राहून तिचे कल्यात करतो हे निश्चित.
 
सोमवारी उपास करण्याची गरज नाही. मात्र त्या दिवशी कांदा - लसूण किंवा इतर तामसिक पदार्थ खाणे टाळावे.
शुभ्र किंवा आळणी पदार्थच न खाता नेहमीचे जेवण करावे.
शेवटच्या सोमवारी व्रत करणार्‍या भगिनींनी गोड जेवण जेवावे. त्या दिवशी उपास करण्याची आवश्यकता नाही.
लोणी काढल्यावर उरलेल्या ताकाची कढी करुन सर्वांनी प्यावी.
व्रत मोठ्या श्रद्देने करावे. सोमवारी गोपाळकृष्ण आपला पिता आहे असा भाव दिवसभर ठेवावा. त्वरित शुभ अनुभव येईल.
रात्री पांढरे कपडे बदलण्यास हरकत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती