1 लोभी लोकांना चुकून देखील गुपित सांगू नये-
विदुरच्या नीतीनुसार, जो माणूस लोभी स्वभावाचा असतो, त्याला कधीही आपले गुपित सांगू नये. विदुर सांगतात की असे लोभी माणूस कोणाचेही विश्वासू नसतात. असे लोक थोड्या लोभात येऊन आपला विश्वास तोडतात.
2 हुशार आणि लबाड लोकांना गुपितं सांगू नये-
विदुर म्हणतात की हुशार आणि लबाड लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये. असं करणे हानिकारक होऊ शकत. असे लबाड लोकांना आपल्या जीवनात सुद्धा जागा देऊ नये.
3 बडबड्या लोकांना गुपित सांगू नये-
बडबड्या लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये. महात्मा विदुर म्हणतात की जास्त बोलणारे लोक सहजपणे एखाद्याच्या भावनांना आणि विचारांना ऐकून वेळ पडल्यास त्याला स्वतःच्या हितासाठी वापरण्याचा प्रयत्न करतात.