बारा प्रकारचे गुरु आणि त्यांची वैशिष्ट्ये

बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (14:38 IST)
पांडवप्रतापाच्या पांचव्या अध्यायाप्रमाणे गुरु बारा प्रकारचे आहेत आणि अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त नाही -
 
१. धातुर्वादी गुरुः शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ति करून देणारे.
 
२. चंदन गुरुः चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो (हिंगणवेळू व केळीचे वृक्ष सोडून) तसा अमक्त शिवायकरून आपल्या केवळ समागमानेच भक्तांस तारणारे.
 
३. विचार गुरुः नित्य विचाराने शिष्यास ज्ञान करून देऊन पिपीलिकार्माने साक्षात्कार करून देणारे.
 
४. अनुग्रह गुरुः शिष्याव्र कृपानुग्रह करणारे, त्याच्या प्रतापानेच सायास न होतां शिष्यास ज्ञान देणारे.
 
५. परीस गुरुः परीस ज्याप्रमाणे स्प्रर्शमात्रेने लोह ते सुधर्ण बनवितो त्याप्रमाणे स्पर्शाने शिष्यास गुरुत्व प्राप्त करुन देणारे.
 
६. कच्छप गुरुः कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणे नुसत्या अवलोकनाने पिलांचें पोषण करिते, त्याप्रमाणे कृपावलोकनानेच शिष्याचा उद्धार करणारे.
 
७. चंद्र गुरुः चंद्र उदय पावताच चंद्रकांतास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अंतर द्रवताच दूरचे शिष्यही तरणारे.
 
८. दर्पण गुरुः आरशात पाहिल्याबरोबर आपले मुख आपणास दिसतं. त्याप्रमाणे नुसत्या दर्शनाने स्वरूपज्ञान देणारे.
 
९. छायानिधि गुरुः छायानिधि या नावाचा एक मोठा पक्षी आकाशात फिरत असतो. त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो. त्याप्रमाणे आपली छायेने तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपती करणारे.
 
१०. नादनिधि गुरुः नादनिधि नावाच्या मण्यात ज्या धातूचा घ्वनी त्याच्या कानात पडतो त्या सर्व धातू स्वस्थानी सुवर्ण बनतात. त्याप्रमाणे मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानी पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान प्रदान करणारे.
 
११. क्रौंचपक्षी गुरुः क्रौंच नावाची पक्षीण समुद्रतीरी पिले ठेवून चारा घेण्यासाठी सहासहा महिने दूरदेशी फिरावयास जाते. व वारंवार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते. त्या योगाने तेथे पिले पुष्ट होतात. त्याचप्रमाणे शिष्याची आठवण करुन त्याला त्याच्या स्थानी असताच तारणारे.
 
१२. सूर्यकांत गुरुः सूर्याची इच्छा नसतानाही सूर्यदर्शनाने सूर्यकांत मण्यात अथवा भिंगात अग्नी पडतो व खाली घरलेला कापूस जळतो. त्याप्रमाणे ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती