अधिक महिना याला पुरूषोत्तम मास का म्हणतात? मल मासात काय करावे?

शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (14:31 IST)
अधिक मासाचे आराध्य स्वामी भगवान श्री विष्णू मानले गेले आहेत. पुरुषोत्तम हे भगवान श्री विष्णूंचे एक नाव आहे. म्हणून अधिक मासाला पुरूषोत्तम मास म्हणून देखील म्हटले जाते. याला मल मास देखील म्हणतात.
 
पुराणात या विषयाशी निगडित एक अतिशय रंजक गोष्ट आढळते. असे म्हटले जाते की भारतीय विद्वानांनी आपल्या गणना पद्धतीने प्रत्येक चंद्र महिन्यासाठी एक एक देव निश्चित केले आहेत. जरी अधिक महिना सूर्य आणि चन्द्र महिन्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी असला तरी ही या अतिरिक्त महिन्याचा अधिपती होण्यासाठी कोणीही देव तयार नव्हते अश्या परिस्थितीत ऋषी मुनींनी भगवान श्री विष्णूंना विनवणी केली की तेच स्वतः या महिन्याचे भार स्वतःवर घ्यावे. भगवान श्री विष्णूनी त्यांचा विनवणीला मान देऊन हे स्वीकारले आणि अश्या प्रकारे हा मलमासा प्रमाणेच पुरूषोत्तम मास देखील झाला.
 
अधिक मासात काय करावे
हिंदू भक्त सामान्यतः अधिक महिन्यात व्रत कैवल्य, उपवास, पूजा, पठण, ध्यान, भजन, कीर्तन, चिंतन याला आपले जीवनक्रम बनवतात. पौराणिक तत्वांच्यानुसार या महिन्यात यज्ञ-हवनाच्या व्यतिरिक्त श्रीमद् देवीभागवत, श्री भागवत पुराण, श्री विष्णु पुराण, भविष्योत्तर पुराण इत्यादींचे श्रवण किंवा पठण आणि ध्यान करणं फलदायी असतं.
 
अधिक महिन्यातील भगवान विष्णू हे प्रमुख देव आहे, म्हणून या संपूर्ण काळात विष्णूंच्या मंत्राचे जप करणे फायदेशीर आहे. असे मानले जाते की अधिक महिन्यात किंवा मासात विष्णूंच्या मंत्रांचे जप करणाऱ्या साधकांना खुद्द विष्णू देव आशीर्वाद देतात, त्यांचे सर्व पाप नाहीसे करतात आणि त्यांचा  सर्व इच्छापूर्ण करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती