सूर्य ग्रहणानंतर अन्न, धान्य, कपडे आणि धन दान-पुण्य करण्याचे विधान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात. हा उपाय केल्याने नवीन वर्षात ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि नोकरीत असणार्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढते आणि ट्रांसफरची संधी देखील मिळेल.
नवीन वर्ष सुरळीत पार पडावं यासाठी ग्रहणानंतर राहू-केतू संबंधी उपाय करणे लाभदायक ठरेल. राहू-केतू शांत असल्यास सर्व काम सुरळती पार पडतात. नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. राहू-केतू शांती हेतू ग्रहण संपल्यावर तीळ, तेल, कोळसा, काळे वस्त्र दान करावे. हे दान अंघोळ केल्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे.
सूर्य ग्रहणानंतर गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक मदत करा.
नवीव वर्षात शनीदेव राशी परिवर्तन होत असल्याने शनी मंत्रांचा जप करावा आणि या संबंधी वस्तूंचे दान करणे देखील शुभ ठरेल.