मल्लासी बोले नारायण ॥ सांगावया आलों तुज कारण ॥ उरलें सैन्यातें घेवोन ॥ पाताळासीं जाय ॥४॥
मार्तंड बळ अद्भुत ॥ सैन्य मारिलें समस्त ॥ मणीचा केला प्राणघात ॥ बहुत विख्यात प्रताप ते ॥५॥
आतां वेग शरण जाई ॥ लाग मार्तंडाचे पायीं ॥ जीव वांचवोनि सुखी राही ॥ पाताळ भुवनांत ॥६॥
मल्ल म्हणे देवराजा ॥ पाहेपा पराक्रम माझा ॥ जिकोनियां दशभुजा ॥ रक्तप्राशन करीन मी ॥७॥