षट्तिला एकादशी तीळ दान महत्त्व आणि कथा

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (11:43 IST)
एकेकाळी दालभ्य ऋषींनी पुलस्त्य ऋषींना विचारले की - हे महाराज, पृथ्वी लोकात मनुष्य ब्रह्म हत्यादी महान पाप करतात, परकीय पैशांची चोरी व दुसर्‍यांची प्रगती बघून ईर्ष्या करतात. अनेक प्रकाराच्या व्यसनात अडकतात तरी त्यांना नर्क प्राप्ती होत नसते, यामागील कारण आहे तरी काय? ते असे कोणते दान-पुण्याचे कार्य करतात ज्याने त्यांचे सर्व पाप नाहीसे होतात, हे आपण मला सांगावे.
 
पुलस्त्य मुनी म्हणतात की - हे महाभाग! आपण मला अत्यंत गंभीर प्रश्न विचारला आहे. याने संसारातील प्राण्यांचं भलं होईल. हे गूढ ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि इंद्र इतरांना देखील माहित नाही परंतू मी आपल्याला या गुप्त तत्त्वांबद्दल निश्चित सांगेन.
 
त्यांनी म्हटले की पौष महिन्यात मनुष्याने स्वत:ला शुद्ध ठेवले पाहिजे. इंद्रियांवर ताबा ठेवून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या आणि द्वेष यांचा त्याग करावा आणि देवाचे स्मरण करावे.
 
पूजा विधी 
अंघोळ केल्यावर सर्व देवतांचे ध्यान करुन देवाची पूजा करावी आणि एकादशी व्रताचं संकल्प घ्यावं. रात्री जागरण करावे.
 
दुसर्‍या दिवशी धूप-दीप, नैवेद्य इतरांनी देवाची पूजा करुन खिचडीचा नैवदेय दाखवावा. नंतर पेठा, नारळ, सीताफळ किंवा सुपारीने अर्घ्य देऊन स्तुती करावी.
 
हे प्रभू! आपण गोर-गरीबांना शरण देणारे आहात, या संसारात रमलेल्या लोकांचा उद्धार करणारे आहात. हे पुंडरीकाक्ष! हे विश्वभावन! हे सुब्रह्मण्य! हे पूर्वज! हे जगत्पते! आपण देवी लक्ष्मीसह हे अर्घ्य स्वीकार करा.
 
नंतर पाण्याने भरलेलं कुंभ ब्राह्मणाला दान करावे आणि ब्राह्मणाला श्यामा गौ आणि तीळ पात्र देणे देखील उत्तम आहे. तीळ स्नान आणि भोजन दोन्हीं श्रेष्ठ ठरतं. या प्रकारे या एकादशी ‍तीळाचे दान केल्याने मनुष्य हजारो वर्ष स्वर्गात वास करतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती